भाजप- शिवसेना एकत्रच निवडणूक लढवणार आहेत, त्यांना माहित आहे स्वतंत्र लढलं तर घरीच जाऊ, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. कांदळी येथे झालेल्या जुन्नर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते.
शेतमालाची अवस्था बेकार झाली आहे, शेतकऱ्यांची अवस्था पहा आणि मग बोला, मुंबईत राहून बोलू नका अशी जोरदार टीकाही त्यांनी सरकारवर केली.
काहीजण दुटप्पी बोलतात आणि करतात, त्यामुळे आमच्या पक्षाची विचारधारा पटत नसेल तर तुमची वाट मोकळी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
Comments 0